Happy Doctors' Day 2023: 'या' मेसेजच्या माध्यमातून डॉक्टर्संना द्या खास शुभेच्छा

Happy Doctors' Day 2023: 'या' मेसेजच्या माध्यमातून डॉक्टर्संना द्या खास शुभेच्छा

Happy Doctors' Day 2023: दरवर्षी १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस भारतातील सर्व डॉक्टरांना आणि त्यांच्या महानतेला समर्पित आहे.
Published on

Happy Doctors' Day 2023: डॉक्टर हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहे. ते आपल्या जीवनाचे विविध प्रकारच्या रोगांपासून संरक्षण करतात. औषधाचे काम हे मोठे काम आहे. तो आपल्यासाठी देवासारखा आहे. डॉक्टर नेहमीच रुग्णांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतात. दरवर्षी १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस भारतातील सर्व डॉक्टरांना आणि त्यांच्या महानतेला समर्पित आहे. आजच्या तुम्ही डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा एसएमएस, स्टेटस तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता.

सुपरहिरो कॅप्स घालत नाहीत, ते अ‍ॅप्रॉन घालतात आणि आमच्या कठीण काळात आम्हाला वाचवतात. तुमच्या सेवेबद्दल कृतज्ञ!

हॅप्पी डॉक्टर्स डे

रुग्णांना बरे करणे हा एकच ध्यास

अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून

आजचा दिवस करूया खास

डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले

असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हास भेटले

डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्यावर आलेलं आरोग्यसंकट

देवदूत रूपी होऊन दूर सारणार्‍या

प्रत्येक आरोग्यकर्मीला सलाम

डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोरोना विरुद्धच्या प्राणघातक लढ्यात ढाल बनून उभे

 राहिलेल्या सर्व डॉक्टरांना प्रणाम

डॉक्टर दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com