लोकशाही स्पेशल
होळीचा रंग काढायचा आहे ? वाचा प्रभावी उपाय
होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे, परंतु होळीच्या रंगांमध्ये उपस्थित रसायने, विषारी घटक आणि कृत्रिम रंगद्रव्य यामुळे त्वचेची जळजळ आणि इतर अनेक समस्या उद्भवतात (tips to remove Holi colors) या काही टिप्स टिप्स ज्याचे अनुसरण केल्याने जबरदस्त परिणाम होईल.
- लांब नखांवर, नखांच्या अंतर्गत भागावर तेलाने मसाज करणे देखील फायदेशीर ठरेल. यामुळे होळीचे रंग निघून जातील आणि नखे निरोगी होतील.
- नखांभोवती लिंबाची उरलेली साल देखील घासू शकता.
- नारळाचे तेल कॉटन बॉलवर घेऊन ते आपल्या नखांवर लावून ठेवू शकता, जे सहजपणे नाखांवरील रंग काढून टाकेल.
- नखे गुळगुळीत आणि सुव्यवस्थित ठेवल्यास रंगांमुळे नखे खराब होण्याची शक्यता देखील कमी होते.
- दररोज झोपायच्या आधी, आपल्या नखांवर एक ते दोन थेंब तूप किंवा काही थेंब तेलाने मसाज करा.
- होळीच्या आधी रात्री नेल पेंटचा जाड थर लावल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. यामुळे आपल्या नखांमध्ये आणि होळीच्या रंगांमध्ये नेलपेंट कव्हर म्हणून काम करेल.