Lokshahi Marathi Impact : दहिसरमधील 7 एकरचा भूखंड घोटाळा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले?

Lokshahi Marathi Impact : दहिसरमधील 7 एकरचा भूखंड घोटाळा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले?

लोकशाही मराठी इम्पॅक्ट : दहिसरमधील 7 एकरचा भूखंड घोटाळा उघडकीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या.
Published by :
Prachi Nate
Published on

लोकशाही मराठी इम्पॅक्ट - दहिसर एकसर गावातील महापालिकेचा जवळपास सात एकर चा भूखंड अद्यापही खातपत पडला आहे. विकासात अल्पेश अजमेरा यांच्याकडून जवळपास साडेतीनशे कोटी रुपये देऊन विकत घेतलेला हा महापालिकेच्या भूखंड यावर अद्यापही महापालिकेकडून प्रस्तावित हॉस्पिटल किंवा खेळाच्या मैदानाबाबत कोणत्याही पावलं उचलली जात नाहीयेत.

लोकशाही मराठीने हा मुद्दा उचलून धरला होता. महा पालिकेने झोपडपट्टी असलेला हा भूखंड नेमका का खरेदी केला? असा सवाल लोकशाही मराठीच्या माध्यमातून पुढे आणला होता. आज स्थानकी आमदार मनिषा चौधरी यांनीही विधानसभेत या मुद्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. लोककही मराठीने हा मुद्दा उपस्थित केल्यानेच पुन्हा एकदा या भूखंडाच्या खरेदी मागे काय गौडबंगाल आहे हे आता समोर येणार आहे.

विकत घेत असतानाच या भूखंडावर असलेल्या झोपडपट्टी बाबत देखील महापालिका कडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दहिसर एक्सर गावातील विकासक अजमेरा यांनी २०११ मध्ये २.९७ कोटी रुपयांना ही जमीन खरेदी केली होती तीन महिन्यांत, बीएमसीने ते ५४ कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढील नऊ वर्षांत, ही जमीन ३४९ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com