1993 बॉंबस्फोट : ३० वर्षानंतर त्या घटनेने अंगावर शहारे येतात…अजूनही मुख्य आरोपी फरार
12 मार्च 1993 या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी मुंबई (Mumbai) मधील मुंबई शेअर बाजारासह (Stock exchange) 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला. त्यात 700 हून अधिक जखमी झाले. त्या घटनेच्या आठवणींने मुंबईकरांनाच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकांचा अंगावर आजही शहारे उभे राहतात.
१२ मार्च १९९३ या दिवशी मुंबईतील स्टॉक एक्सचेंजसह १३ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला. 700 हून अधिक जखमी झाले. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 28 माळ्याच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये दुपारी 1.30 वाजता हा स्फोट झाला. ज्यामध्ये सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला. त्याच्या अर्ध्या तासानंतर एका कारमध्ये स्फोट झाला आणि पुढच्या दोन तासाच्या आत एकूण 13 स्फोट झाले होते. या स्फोटात सुमारे 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा नुकसान झाले होते
4 नोव्हेंबर 1993 रोजी या प्रकरणात एकूण 189 गुन्हेगारा विरुध्द 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आली. नंतर 19 नोव्हेंबर 1993 रोजी हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आली. १९ एप्रिल १९९५ रोजी मुंबईतील टाडा न्यायालयात (TADA court) या खटल्याची सुनावणी सुरू झाली. सप्टेंबर 2006 मध्ये न्यायालयाने आपले निर्णय देण्यास सुरुवात केली.
फक्त एकालाच मिळाली फाशी
या प्रकरणात एकूण 123 आरोपी होते. त्यातल्या 12 आरोपीनां कनिष्ठ न्यायालयाने (lower court) फाशीची शिक्षा सुणावली होती. आणि 68 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर 23 जणांना निर्दोश ठरवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याकूब मेमनला (Yakub Memon) सोडून बाकी सगळ्या आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत बदलण्यात आलं. याकूबला 2015 मध्ये फाशी देण्यात आली. टाइगर मेमन (Tiger Memon) आणि दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आजही या प्रकरणात फरार आहेत.