Maharashtra Krishi Din 2021: महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

Maharashtra Krishi Din 2021: महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

Published by :
Published on

महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच त्यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने 1 जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. चला तर आज वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊयात… कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल? याकडे त्यांनी लक्ष दिले होते.

1965 मध्ये त्यांनी सांगितले होते कि, दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फासावर जाईन. त्यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

त्यांनी राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. 1972 च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. त्यांनी राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने'तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला.म्हणूनच कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करत असतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com