महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'हे' प्रेरणादायी विचार ठेवून करा अभिवादन
Mahatma Phule Death anniversary : ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जाते. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुलेंची पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांचे काही खास विचार आपल्या स्टेटसला ठेवून महात्मा फुलेंना अभिवादन करा.
विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.
- महात्मा फुले
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो कधी जातीचा तर कधी धर्माचा धर्म महत्त्वाचा नाही माणुसकी असली पाहिजेल
- महात्मा फुले
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांना आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन
प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू
शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.
ज्यांना कुठलेतरी उद्दीष्ट गाठायचे असते.
- महात्मा फुले