लाडक्या बाप्पासाठी घरच्या घरी बनवा पान मोदक
बाप्पाच्या आवडता नैवेद्य मोदकाची तयारीही सुरु झाली असेल. कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य करायाचा याचं प्लॅनिंग सुरु झालं असेल. त्यामुळेच तुमच्यासाठी आम्ही खास पान मोदकाची रेसपी घेऊन आलोय. घरच्या घरी पान मोदक कसा तयार करायची रेसपी...
साहित्य :
खायची सहा पाने
तूप - एक मोठा चमचा
बारीक साखर - एक मोठा चमचा
गुलकंद - एक मोठा चमचा
गुलाबची सुखलेली पाने - एक मोठा चमचा
कंडेंस्ड मिल्क-1/4 कप
सूखलेल्या नाराळचा खिस -1/2 कप
फूड रंग -2 थेंब
टूटी-फ्रूटी - 2 चमचे
कृती :
पान मोदक तयार करण्यासाठी सर्वात आधी देठ काढून पानाचे लहान तुकडे करा
मिक्सरमध्ये कंडेंस्ड दूध, पानाचे तुकडे आणि साखर टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करुन घ्या
- पॅन घ्या ...
- पॅन गरम झाल्यानंतर तूप टाका... त्यानंतर लगेच नाराळचा खिस टाकून व्यवस्थित भाजून घ्या
- त्यानंतर पान-साखरेची पेस्ट त्यामध्ये मिक्स करा
- या मिश्रणाला दोन मिनिटं व्यवस्थित भाजा
- त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगाचा रंग टाका...
- हे मिश्रण व्यवस्थित मिसळा
- चव वाढवण्यासाठी आणि मिश्रण घट्ट होण्यासाठी थोडं खिसलेलं खोबरं, गुलकंट, टुटी फ्रुटी आणि एक चमचा कंडेंस्ड मिल्क टाका...
- या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करा...
- थोड्यावेळानंतर गॅस बंद करा..
- मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.
- तुमचे चविष्ट पान मोदक तयार झाले.