नवीन वर्षात तुमच्या प्रियजनांना द्या 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा
Happy New Year 2024 : नवीन वर्ष 2024 जानेवारीपासून सुरू होणार आहे. नववर्षाच्या आगमनाबाबत लोकांमध्ये एक वेगळाच जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे, नवचैतन्य पाहायला मिळत आहे. गतवर्षीप्रमाणेच अनेकजण जुन्या कटू आठवणी सोडून नवी स्वप्ने पूर्ण करण्याचे ध्येय बाळगतात. यासोबतच ते एकमेकांना शुभेच्छाही देतात. यावेळी नवीन वर्षाच्या दिवशी आपल्या प्रियजनांना या शुभेच्छा पाठवून प्रेरित करा.
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
संपणार आहे 2023
प्रॉब्लेम सारे आता विसरा
विचार करू नका दुसरा
चेहरा नेहमी ठेवा हसरा
आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!