कलिंगडाच्या शेतीतून संगमनेरचा युवा शेतकरी बनला ‘लखपती’

कलिंगडाच्या शेतीतून संगमनेरचा युवा शेतकरी बनला ‘लखपती’

Published by :
Published on

संंगमनेर | आदेश वाकळे | संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडीचा 29 वर्षीय युवा शेतकरी कलिंगडाच्या पिकातून लखपती बनला आहे. त्याची अनोखी कलिगडांची शेती पाहाण्यासाठी सध्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.उन्हाळ्याच्या तोंडावर संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावचे युवा शेतकरी मंगेश साळगट यांनी फेब्रुवारी महिन्या शुगरकींग जातीच्या कलिंगडांच्या रोपांची दोन एकर परीसरात लागवड केली.

अधुनिक शेतीची कास धरत साळगट यांनी माळरानावर मलचिंग पेपर आणि ठिबसिंचनाचा वापर केला आहे. यामुळे योग्य पाण्याचे व्यवस्थापन होत असून खतांचाही योग्य प्रमाणात वापर होत आहे. आजवर साळगट यांनी 70 ते 80 टनाचा माल बाजारपेठेत विकला आहे.

तसेच आगामी काळात आणखी 30 ते 40 टन माल निघण्याची अपेक्षा त्यांना आहे. या कलिंगडाला त्यांना दहा रुपये किलोचा बाजारभाव मिळत असून एका कलिंगडाचे वजन पाच ते सहा किलो भरत आहे. दीड ते दोन लाख रुपये खर्च वजा करत त्यांना कलिंगडाच्या शेतीतून सहा ते सात लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com