समृद्धी महामार्ग आहे तरी कसा? काय आहेत त्याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. 11 तारखेनंतर सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. समृद्धी महामार्गाचे वैशिष्ठ म्हणजे हा महामार्ग रात्री उजळून निघतो आणि तोही सौरऊर्जेने. ७०१ किलो मीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास हा १७ तासांवरून हे अंतर ७ तासांवर येणार आहे.
देशातील सर्वात मोठा हरित मार्ग असणार आहे, कारण या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी ११ लाख वृक्ष असणार आहे. तर राज्यातील एकूण ३६ टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी ५५,३५५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.५५,००० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा, समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी सुमारे ९,९०० हेक्टर जमीन संपादित केली आहे. १०,००० हेक्टर जमीन कृषी समृद्धी नगर विकसित करण्यासाठी आणि १४५ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गाजवळील सुविधा आणि सुविधांसाठी वापरली जाईल.
महामार्गाला राज्यातील १४ जिल्हे पोर्टने जोडले जाणार आहेत. प्रतिदिवशी 30 ते 35 हजार वाहने धावणार आहेत. महामार्गामुळे शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता, एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.समृद्धी महामार्ग हा ३ अभयारण्यातून जाणार आहे. काटेपुर्णा (अकोला), कारंजा (वाशीम), तेन्सा (ठाणे). त्यामुळे या भागात प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये यासाठी अंडरपासची देखील सोय करण्यात आली आहे. असे एकूण 209 अंडरपास समृद्धी महामार्गावर आहेत.
या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार आहे. सर्वाधिक गतीने पूर्ण भूसंपादन या महामार्गावर झाले. 8800 हेक्टर जागा ही सर्वाधिक गतीने भूसंपादन करण्यात आली. अवघ्या 12 महिन्यात भूसंपादन करण्यात आली. यासाठी 8003.03 कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले.