Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला करा 'हे' सोपे उपाय, दूर होतील सर्व बाधा

Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला करा 'हे' सोपे उपाय, दूर होतील सर्व बाधा

आषाढ महिन्याची संकष्टी चतुर्थी उद्या म्हणजे ७ जूनला आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते.
Published on

Sankashti Chaturthi 2023 : आषाढ महिन्याची संकष्टी चतुर्थी उद्या म्हणजे ७ जूनला आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते. श्रीगणेश हा भक्तांचे विघ्न दूर करणारा मानला जातो. व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात. चला जाणून घेऊ...

जर तुम्ही विवाहयोग्य असाल, पण लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला 21 गुळाच्या गोळ्या आणि दूर्वा अर्पण करा. यामुळे लवकर विवाह होतो.

व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणा. त्यांची पूजा करून गणेशाला हळदीच्या पाच गुंठ्या अर्पण करा. लवकरच बढतीची शक्यता आहे.

गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना करा.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'वक्रतुण्डाय हुं' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. यासोबतच घरात सुख-शांती राहते.

जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्रीगणेशाची पूजा करा. नंतर गूळ व तूप अर्पण करावे. नंतर तो भोग गायीला खाऊ घाला. याचा फायदा होईल.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून 'ओम गण गणपतये नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. हा उपाय तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com