Sankashti Chaturthi 2021 : आज संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त!
पंचांगानुसार, पौष महिन्याची पहिली आणि 2021 वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी ही आज (22 डिसेंबर 2021) आहे. या दिवशी अनेक शुभ योग आहेत. या पार्श्वभूमीवरच संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात…
संकष्टी चतुर्थी 2021 : कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी आसतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात.
गणपतीची पूजा : आज गणपतीची विधी पूर्वक पूजा करा. त्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त
● चतुर्थी तिथी : 22 डिसेंबर 2021, बुधवार
● पूजन मुहूर्त : रात्री 08:15 ते रात्री 09:15 पर्यंत (अमृत काळ)
● चंद्र दर्शन मुहूर्त : रात्री 08:30 ते रात्री 09:30 पर्यंत
बुधवारी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व : या महिन्यात संकष्टी चतुर्थी ही बुधवारी आली आहे. बुधवार हा गणपतीला समर्पित केला जातो. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. संकष्टी चतुर्थीला अनेक लोक उपवास करतात. चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडला जातो. पंचांगानुसार चतुर्थीच्या तिथीची सुरूवात दुपारी 4 वाजून 54 मिनिटांनी होणार आहे.