सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'या' प्रेरणादायी विचारांद्वारे करा अभिवादन

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'या' प्रेरणादायी विचारांद्वारे करा अभिवादन

सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिलामुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. क्रांतीज्योतीच्या जयंतीनिमित्त व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करा.
Published on

Savitribai Phule Birth Anniversary : मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिलामुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. क्रांतीज्योतीच्या जयंतीनिमित्त व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करा.

शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई,

तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई!

आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

सावित्री जुन्या जगाची तु प्रेरणा नव्या युगाची…

झेलुनी चिखल शेनमातीचे अन्यायी अत्याचारी सडे…

दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे….

निर्मळ गंगा तु अक्षराची प्रेरणा नव्या युगाची…

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

ती लढली म्हणून आम्ही घडलो!!!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांच्या शिक्षणाची खरी, सावित्री तूच कैवारी,तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी ,

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com