Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिलामुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्या
स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण घ्या, शिक्षणच माणसाचा खरा दागिना आहे
शिक्षण स्वर्गाचे दार खुले करतात, स्वतःला ओळखण्याची एक संधी मिळते
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार
शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा
कुणी तुम्हाला कमकुवत समजेल, या अगोदर तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजायला हवं
शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री
ज्ञान हा अज्ञानाचा अंधार दूर करणारा दिवा बनू दे