दिनविशेष 10 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 9 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 5 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००१: स्पेस शटल प्रोग्राम - स्पेस शटल डिस्कव्हरी एसटीएस-105 वर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित करण्यात आले.
१९९०: मॅगेलन स्पेस प्रोब - शुक्र ग्रहावर पोहोचले.
१९८८: दुसर्या महायुद्ध - बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१९४४: दुसरे महायुद्ध - ग्वामची लढाई संपली.
१९४४: दुसरे महायुद्ध - नार्वाची लढाई: जर्मनीचा विजय, लढाई संपली.
१८९७: फेलिक्स हॉफमन - जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांनी ऍसिटिसालिसिलिक ऍसिड (एस्पिरिन) चे संश्लेषण करण्याचा सुधारित मार्ग शोधला.
१८२१: अमेरिका - मिसुरी हे अमेरिकेचे २४वे राज्य बनले.
१८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन - स्थापना झाली.
१७९३: म्युसी डु लूवर, पॅरिस, फ्रान्स - सुरु झाले.
१७४१: त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मायांनी डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आण भारतातील डच वसाहतवादी राजवटीचा अंत घडवून आणला.
१६७५: रॉयल ग्रीनविच लॅब्रेटोरी, लंडन, इंग्लंड - पायाभरणी झाली.
आज यांचा जन्म
१९६३: फुलन देवी - भारतीय राजकारणी (निधन: २५ जुलै २००१)
१९६०: देवांग मेहता - तंत्रज्ञान अग्रणी (निधन: १२ जुलै २००१)
१९५६: परवीन वारसी - भारतीय-इंग्रजी उद्योगपती
१९५६: पेरीन वॉर्सी - भारताती-इंग्रजी उद्योगपती
१९४३: शफकत राणा - भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
१९३३: किथ डकवर्थ - कोसवर्थ कंपनीचे संस्थापक (निधन: १८ डिसेंबर २००५)
१९३२: रघुनाथ पनिग्राही - भारतीय गायक-गीतकार (निधन: २५ ऑगस्ट २०१३)
१९३१: कृष्ण चंद्र पंत - भारतीय राजकारणी (निधन: १५ नोव्हेंबर २०१२)
१९३०: शिवाजी पटनायक - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: २३ मे २०२२)
१९२२: हरी हरिलेला - भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी (निधन: २९ डिसेंबर २०१४)
१९१३: डॉ. अमृत माधव घाटगे - संस्कृत व प्राकृत विद्वान (निधन: ८ मे २००३)
१९०२: नॉर्मा शिअरर - कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री (निधन: १२ जून १९८३)
१८९४: व्ही. व्ही. गिरी - भारताचे ४थे राष्ट्रपती - भारतरत्न (निधन: २४ जून १९८०)
१८८९: चार्ल्स डॅरो - मोनोपोली खेळाचे निर्माते (निधन: २८ ऑगस्ट १९६८)
१८८७: सॅम वॉर्नर - वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (निधन: ५ ऑक्टोबर १९२७)
१८७४: हर्बर्ट हूव्हर - अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २० ऑक्टोबर १९६४)
१८६०: पं. विष्णू नारायण भातखंडे - संगीतशास्त्रकार, गांधर्व महाविद्यालयाचे सहसंस्थापक (निधन: १९ सप्टेंबर १९३६)
१८५५: उस्ताद अल्लादियाँ खान - जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक, गान सम्राट (निधन: १६ मार्च १९४६)
१८१४: हेनरी नेस्ले - नेस्ले कंपनीचे संस्थापक (निधन: ७ जुलै १८९०)
१८१०: कॅमिलो बेन्सो - इटलीचे पहिले पंतप्रधान (निधन: ६ जून १८६१)
१७५५: नारायणराव पेशवा - ५वा पेशवा (निधन: ३० ऑगस्ट १७७३)
आज यांची पुण्यतिथी
२०१२: सुरेश दलाल - भारतीय गुजराथी कवी, लेखक आणि संपादक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ११ ऑक्टोबर १९३२)
१९९९: आचार्य बलदेव उपाध्याय - भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
१९९७: नारायण पेडणेकर - कवी व नाट्यसमीक्षक
१९९२: लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात - कोरियातील शांतिसेनेचे सेनापती - पद्मश्री, कीर्तिचक्र (जन्म: १२ ऑगस्ट १९०६)
१९८६: अरुण श्रीधर वैद्य - भारताचे १३वे लष्करप्रमुख, जनरल - महावीरचक्र (जन्म: २७ जानेवारी १९२६)
१९८२: एम. के. वैणू बाप्पा - भारतीय खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १० एप्रिल १९२७)
१९८१: जयंत पांडुरंग नाईक - शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन आणि नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक - पद्म भूषण (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
१९८०: जनरल ह्याह्या खान - पाकिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)
१९५०: खेमचंद प्रकाश - संगीतकार (जन्म: १२ डिसेंबर १९०७)