आज दिवाळीचा पहिला दिवस 'वसुबारस'; जाणून घ्या

आज दिवाळीचा पहिला दिवस 'वसुबारस'; जाणून घ्या

‘वसुबारस; हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. दिवाळीचा सण वसुबारसपासून सुरु होतो. हा सण साजरा करण्याचे कारण म्हणजे आपल्या शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या गायींचा सन्मान करणे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

‘वसुबारस; हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. दिवाळीचा सण वसुबारसपासून सुरु होतो. हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेती संपत्तीचा आधार असलेल्या गायींचा सन्मान करणे. विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी या दिवशी श्री कृष्णासोबतच गायीची पूजा करतात. कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.

दरवर्षी सर्वजण अतुरतेनं दिवाळी सणाची वाट पाहत असतात. आज (21 ऑक्टोबर) दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे.गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरु यांची पूजा केली जाते.

वसुबारसच्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरु असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो.

आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारसपासून दिवाळी पर्वाला सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी वसुबारस साजरी करण्याची परंपरा आहे. यादिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. महाराष्ट्र, गुजरात राज्यासह दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये वसुबारसचा सण साजरा केला जातो.

या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. लोकशाही न्यूज मराठी याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com