आज काय घडले : इंदिरा गांधींची निवडणूक रद्द
सुविचार
स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी आपले दुःख खरेदी करणारा या जगात कोणीच नसतो.
आज जागतिक बालकामगार विरोधी दिवस : सन २००२ पासून जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो.
आज काय घडले
१९०५ साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची पुण्यात स्थापना केली. धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे हा त्यांचा हेतू होता.
१९६४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वर्णद्वेषी विरोधी नेता नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली.
१९७५ मध्ये अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द केली. तसेच त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
१९९६ मध्ये भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
आज यांचा जन्म
बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा १८९४ मध्ये जन्म झाला.
लेखक, कथा, कादंबरीकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा १९१७ मध्ये जन्म झाला. त्यांनी १९४१ ते १९८४ या काळात विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले.
अमेरिकेचा ४१वे राष्ट्राध्यक्ष जार्ज बुश यांचा १९२४ मध्ये जन्म झाला. २० जानेवारी १९८९ ते २० जानेवारी १९९३ या कालखंडात त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.
पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय हॉकी खेळाडू सबाअंजुम करीम यांचा १९८५ मध्ये जन्म झाला.
आज यांची पुण्यतिथी
मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे १९६४ मध्ये निधन झाले.
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित आठ खंडांच्या ग्रंथाचे लिखाण करणारे लेखक डी.जी. तेंडूलकर यांचे १९७२ मध्ये निधन झाले.
संस्कृत साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गोपीनाथ कविराज यांचे १९७६ मध्ये निधन झाले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
भारताचे माजी सरन्यायाधीश प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर यांचे १९८१ मध्ये निधन झाले. १९६४ पासून मार्च १९६६ पर्यंत ते सरन्यायाधीश होते.
मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक पु. ल. देशपांडे यांचे २००० मध्ये निधन झाले. कवी, नाटककार, अभिनेता , दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार म्हणूनही त्यांची ओळख आहे.