बुरखा, नकाब, हिजाब यांच्यातील फरक काय? जाणून घ्या मुस्लीम महिलांच्या पोशाखांविषयी
कर्नाटक हिजाबच्या वादामुळे मुस्लिम महिलांनी परिधान केलेले पारंपरिक पोशाख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यादरम्यान आज (15 मार्च) कर्नाटक उच्च न्यायालयाने सुनावणी देत हिजाब मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही आणि शाळकरी विद्यार्थीनी शालेय गणवेश घालण्यासाठी नकार देऊ शकत नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे स्पष्ट करत मुस्लिम विद्यार्थीनींनी शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी देण्याची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याच पार्श्वभूमीवर बुरखा, नकाब, हिजाब (Burqa, niqab, hijab) यांच्यातील नेमका फरक काय आहे, हे आपण जाणून घेऊयात…
हिजाब: मुस्लिम स्त्रियांचे पारंपारिकपणे परिधान केले जाणारे अनेक पोशाख आहेत, त्यापैकी सर्वात लोकप्रिय पोशाख म्हणजे बुरखा आणि हिजाब. इस्लाममध्ये महिलांना आपल्या वडील (Father) किंवा पतीसमोर (Husband) किंवा इतर बाहेरच्या व्यक्तींसमोर स्वत:ला झाकून ठेवा असे सांगितले जाते. अशामध्ये महिला (Women) स्वत:ला झाकून ठेवण्यासाठी एका विशेष प्रकारचा पोषाख वापरतात. भारत, पाकिस्तान, ईरान, इराक, अमेरिका, इंग्लंडसहीत सर्व जगामध्ये कित्येक मुस्लिम महिला डोक्यापासून पायापर्यंत एक मोठा कपडा परिधान करतात ज्याला हिजाब म्हणतात. (burqa, niqab hijab, Abaya, Al Amira) तर युरोपमधील कित्येक देशांमध्ये हिजाब वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. डेनमार्कचे प्रधानमंत्रीनुसार, त्यांच्या देशामध्ये कोणतीही महिला आपला चेहरा पूर्ण झाकून सार्वजनिक ठिकाणी फिरू शकत नाही.
नकाब : नकाब किंवा निकाब (Niqab or niqab) म्हणजे चेहरा झाकण्यासाठी कापड. यामध्ये डोके पूर्णपणे झाकलेले असते आणि इस्लाममध्ये कुठेही चेहरा लपविण्याचा उल्लेख केलेला नाही फक्त डोकं आणि केस झाकण्याचा उल्लेख केला आहे. पण कट्टरपंथी देशांमध्ये महिलांना आपला चेहरा लपविण्याचा आदेश दिला आहे. अशावेळी नकाब डोक, चेहारा झाकण्यासाठी वापरला जातो. नकाबमधून फक्त डोळे दिसतात. नकाबचा हा कपडा महिलांच्या गळा किंवा खांद्यापर्यंतचा भाग झाकतो. साधारणपणे हा काळा रंगाच्या कपडा असतो जो पीनच्या मदतीने बांधलेला असतो.
बुरखा : भारतामध्ये सहसा मुस्लिम महिला परिधान करतात त्या काळा लबादा सारखा पोषाखाला बुरखा (Burakha) म्हणतात पण बुरखा त्यापेक्षा थोडा वेगळा आहे. नकाबचा पुढचा टप्पा म्हणजे बुरखा आहे. जिथे नकाबमध्ये डोळे सोडून पूर्ण चेहरा झाकला जातो. तिथे बुरख्यामध्ये डोळे देखील झाकलेले असतात. डोळ्यांच्या ठिकाणी जाळी किंवा पातळ कापज असते ज्यामधून आक-पार दिसू शकते. तसेच यासोबतच संपूर्ण शरीरावर विना फिटिंगचा लबादा असतो. याचा रंग एकसारखा असतो ज्यामध्ये परपुरुष आकर्षित होणार नाही.
अबाया : हा तो पोशाक आहे ज्याला भारतामध्ये बुरख्या म्हणतात, यालाच मिडिल ईस्टमध्ये अबाया (Abaya) म्हटले जाते. हा लाब पोषाक आहे जो महिला आत परिधान केलेल्या कपड्यांवर वापरू शकतात. त्यामध्ये डोक्याला एक स्कार्फ असतो ज्यामध्ये केस झाकलेले असतात आणि चेहरा दिसतो. आता फॅशननुसार यामध्ये कित्येक रंगामध्ये उपलब्ध आहे.
ओढणी : पाकिस्तान आणि भारतामध्ये (Pakistan and India) सलवार-कुर्तासोबत (Salwar-kurta) महिला डोक झाकण्यासाठी ओढणीचा (Odhani) वापर करतात. ओढणी सलवार-कमीजचा भाग असते. याचा मुख्या उद्देश डोके झाकणे असतो. इस्लाम शिवाय भारतामध्ये बहूतेक हिंदू महिला देखील डोक झाकण्यासाठी ओढणी वापरतात. राजस्थान आणि हरियामध्ये कित्येक ठिकाणी महिलांना चेहरा झाकूनच घरातील काम करावे लागते.
जिथे एकीकडे धार्मिक आणि सामाजिक पातळीवर मुस्लिम महिलांच्या पोषाखांसंबधी काही गैरसमज देखील आहेत. तसेच पोषाखांचे प्रकार गैर-मुस्लिम लोकांना गोंधळात टाकातात. हिजाब, बुरखा, अबाया असे वेगवेगळे प्रकार असले तरी त्याचे काम मात्र एकच आहे, ते म्हणजे महिलांचे शरीर आणि केस झाकणे जेणेकरून तिला पाहून कोणत्याही पुरुषाचा तोल जाऊ नये.