International Mother Language Day :  'जागतिक मातृभाषा दिन' का साजरा केला जातो, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

International Mother Language Day : 'जागतिक मातृभाषा दिन' का साजरा केला जातो, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो.
Published by :
shweta walge
Published on

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. जगभरात, भाषा हे एक साधन आहे जे लोकांना एकमेकांशी जोडते आणि त्यांची संस्कृती प्रतिबिंबित करते. देशात अनेक मातृभाषा असू शकतात. एकट्या भारतात अशा १२२ भाषा आहेत, ज्यात बोलणाऱ्यांची संख्या १० हजारांहून अधिक आहे.

29 भाषा आहेत ज्या 10 लाख लोक बोलतात. बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, अरबी, जपानी, रशियन, पोर्तुगीज, मंदारिन आणि स्पॅनिश यांचा समावेश होतो. जगातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनेक मातृभाषांबद्दल जागरूकता आणण्याच्या उद्देशाने दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2023 ची थीम, इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया.

मातृभाषा दिनाचा इतिहास

1999 मध्ये UNESCO ने 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. बांगलादेशने प्रथमच हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. पुढे 2000 सालापासून हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला.

21 फेब्रुवारी रोजी का साजरा करतात मातृभाषा दिवस

भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पश्चिम बांगलादेशमध्ये उर्दू आणि पश्चिम बांगलादेशमध्ये बंगाली भाषिकांचे प्रमाण अधिक होते. तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती. पाकिस्तान सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ढाका विद्यापीठातील आंदोलनावर पोलिसांनी 21 फेब्रुवारी 1952 रोजी गोळीबार केला होता. आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमतं घ्यावं लागले आणि बंगाली भाषेलाही मान्यता दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com