National Mathematics Day 2023 : 'राष्ट्रीय गणित दिवस' का साजरा केला जातो? जाणून घ्या

National Mathematics Day 2023 : 'राष्ट्रीय गणित दिवस' का साजरा केला जातो? जाणून घ्या

राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी २२ डिसेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये गणित विषयाचे महत्त्व आणि उगम याची जाणीव करून देणे आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

National Mathematics Day 2023 : राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी २२ डिसेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये गणित विषयाचे महत्त्व आणि उगम याची जाणीव करून देणे आहे. २२ डिसेंबर हा दिवस श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्यांना ओळखण्यासाठी प्रामुख्याने साजरा केला जातो. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी म्हैसूरमध्ये झाला.

google

'राष्ट्रीय गणित दिवस'चा इतिहास:

भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २६ फेब्रुवारी २०१२ रोजी भारतीय गणिती प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन (२२ डिसेंबर १८८७ ते २६ एप्रिल १९२०) यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या दिवसाची घोषणा केली होती. रामानुजन यांच्याकडे कल्पनांचा खजिना होता. ज्यामुळे त्यांनी २० व्या शतकातील गणित बदलून त्याला आकार दिला.

२०१५ मध्ये 'श्रीनिवास रामानुजन' यांच्या नावाने एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये 'स्लमडॉग मिलियनेयर' फेम अभिनेता देव पटेल यांनी रामानुजन यांची भूमिका साकारली. २०१५ मध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या चरित्रावर आधारित ‘द मॅन हू नो इन्फिनिटी’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून रामानुजन यांचे भारतातील बालपण, नंतर ब्रिटनमधील त्यांच्या काळापासून ते महान गणितज्ञ बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com