कुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमृतस्नान, गंगेची मनोभावे आरती
सध्या सर्वत्र कुंभमेळ्याची चर्चा सुरु आहे. प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी जगभरातील अनेक भाविकांनी हजेरी लावलीय. अनेक दिग्गजांनी आतापर्यंत या मेळ्यात शाही स्नानाचा आनंद घेतला. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतस्नान केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील ऊपस्थित होते. तसेच राज्याचे दोन्ही ऊपमुख्यमंत्रीही ऊपस्थित होते. पंतप्रधानाच्या कुंभमेळा दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना करण्यात आल्या होत्या. पंतप्रधानांनी गंगा आरती करत आशीर्वाद घेतले. महाकुंभमेळा सुरू झाल्या नंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला दौरा आहे.
पंतप्रधान मोदी याआधी 13 डिसेंबर 2024 प्रयागराज येथे उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी 5,500 कोटी रुपयांच्य 167 विकास योजनांचे उद्घाटन केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्या दरम्यान त्यांना कडक सुरक्षा देण्यात आली आहे. कुंभमेळयामध्ये सर्व ठिकाणी श्वानपथकासह सर्व ठिकाणी तपासणी केली गेली. तसेच एटीएस व एनएसजी पथकांकडून सर्वत्र पाहणी करण्यात आली आहे. तसेच संगम क्षेत्रावर पॅरा मिलिट्री फोर्स देखील दाखल झाले आहे. गंगा स्नानानंतर पंतप्रधान मोदी हे इतर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.
कुंभमेळ्याठिकाणी असलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शाही स्नानादरम्यान मोदी यांनी लाल रंगाची वस्त्र परिधान केली होती. तसेच त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ देखील दिसून आली. मंत्र म्हणत त्यांनी गंगेमध्ये शाहीस्नान केले. तसेच पूजादेखील केली. 13 जानेवारी पासून सुरु झालेल्या या कुंभमेळ्यामध्ये 37 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे. तसेच भाविकांना योग्य त्या सोयी सुविधा देखील पुरवल्या जात आहेत.