Mahakumbh 2025: महाकुंभात 7 कोटी 'रुद्राक्ष' मण्यांपासून तयार केली रुद्राक्षांची 12 ज्योतिर्लिंग
प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, महाकुंभ, सोमवार, 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवाने सुरू झाला. तसेच हा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल 45 दिवस या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान महाकुंभातील सेक्टर-6 मध्ये 7 कोटी 51 लाख रुद्राक्ष मण्यांचा वापर करून 12 ज्योतिर्लिंग तयार केली आहेत. ही शिवलिंग साधू महंतांनी हजारो गावांना भेट देत गोळा केलेल्या रुद्राक्षांचा वापर करून तयार करण्यात आली आहे.
महाकुंभाच्या सेक्टर 6 मध्ये बांधण्यात आलेले प्रत्येक ज्योतिर्लिंग 11 फूट उंच, 9 फूट रुंद आणि 7 फूट जाड असून त्याभोवती 7 कोटी 51 लाख रुद्राक्षाच्या मण्यांची माळा बांधलेली आहे. 10,000 गावातून भीक मागून आणि फिरून हे मणी गोळा केले गेले. उत्तर दिशेकडे मुख असलेली सहा आणि दक्षिण दिशेकडे मुख असलेल्या सहा अशी शिवलिंगाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. रुद्राक्षापासून बनलेल्या या ज्योतिर्लिंगांची पाहणी करण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. ही ज्योतिर्लिंग भाविकांचं आकर्षण ठरली आहेत.