Mahakumbh Mela 2025: त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी !

महाकुंभमेळा 2025: १४४ वर्षांतून एकदाच येणारा हा दुर्मिळ सोहळा प्रयागराजमध्ये साजरा होत आहे. त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी!
Published by :
Prachi Nate

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभमेळ्याचा आजचा 10 वा दिवस आहे. १४४ वर्षांतून एकदाच हा दुर्मिळ खगोलीय सोहळा येतो. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी संगमच्या घाटांवर हजारो भाविकांची गर्दी जमली आहे. आतापर्यंत सुमारे ८.८१ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com