महाकुंभ
महाकुंभ मेळ्यासाठी आता उरले फक्त काही दिवस, 33 दिवसांत 50 कोटी भाविकांची हजेरी
देशातील प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळ्याची उत्सुकता बघायला मिळत आहे. 13 जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली. या महाकुंभ मेळ्यासाठी आजवर जगभरातील अनेक भाविकांनी हजेरी लावली आहे. अनेकांनी पवित्र गंगास्नानाचा आनंददेखील घेतला आहे. आतापर्यंत 33 दिवसांत तब्बल 50 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी कुंभस्नान केले आहे.
सुमारे, अमेरिका व रशियाच्या लोकसंख्येइतक्या भाविकांनी प्रयागराज येथे भेट दिली आणि पवित्र महाकुंभस्नान केले आहे. 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी या महाकुंभ मेळ्याची सांगता होणार आहे.