प्रयागराज येथे बस आणि कारचा भीषण अपघात, 10 भाविकांचा मृत्यू, 19 जखमी
सध्या देशात सगळ्यांचेच लक्ष प्रयागराजमधील कुंभमेळ्याकडे लागले आहे. 144 वर्षांनी आलेल्या या कुंभमेळ्यासाठी जगभरातून अनेक भाविक हजेरी लावताना दिसत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचत आहेत. महाकुंभ मेळ्यामध्ये आग लागण्यासारखे अनुचित प्रकारदेखील झाले. पण आता एक नवीन माहिती समोर येत आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या कार आणि बसमध्ये भीषण धडक झाली. यामध्ये कुंभमेळ्याला निघालेल्या 10 भविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 19 भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अपघातासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 10 जणांचा जागीच मृत्यू झाला.