Mahakumbh2025: महाकुंभमेळ्यात अग्नितांडव! आगीत तंबूसह इतर सामान जळून खाक

Mahakumbh2025: महाकुंभमेळ्यात अग्नितांडव! आगीत तंबूसह इतर सामान जळून खाक

महाकुंभ 2025: प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात भीषण आग, तंबू आणि इतर सामान जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरु.
Published by :
Prachi Nate
Published on

प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, महाकुंभ, सोमवार, १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवाने सुरू झाला. तसेच हा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल 45 दिवस या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभ महोत्सवात, १.५० कोटी हुन अधिक भक्तांनी त्रिवेणीत स्नान करण्याचा पवित्र लाभ घेतला.

या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 'शाही स्नान' सह महाकुंभाची सुरुवात झाल्यानं प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. महाकुंभ मधून अनेक बातम्या ऐकायला मिळत होत्या अनेक आगळे-वेगळे साधू संत या कुंभमेळ्यात पाहायला मिळत आहेत.

महाकुंभमेळ्यात आग

अशातच आता प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रयागराजमधील मकुंभमेळ्यात भीषण आग लागली आहे. ही आग शास्त्री पूल सेक्टर १९ मध्ये लागली आहे. तर सिंलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तावली जात असून या आगीत तंबू आणि अनेक लोकांच बरच सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com