Mahakumbha 2025: महाकुंभातील चेंगराचेंगरीदरम्यान जखमींच्या संख्येत वाढ
प्रयागराजमधील सुरु असलेल्या महाकुंभमेळ्या चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. मंगळवारी रात्री 1:30 च्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन, गर्दीमुळे संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली.
रात्री 2 वाजता गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरेकेडींग तुटले आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याविषयी अधिक माहिती प्राप्त झाली आहे.
महाकुंभादरम्यान संगम तीरावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या आतापर्यंत 35 वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 17 तासांनंतर 35 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी सरकारने केली. यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. 90 जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.