Mamta Kulkarni In Mahakumbh 2025: महाकुंभ मेळ्यातून महत्त्वाची बातमी! ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवलं
अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली होती. याविषयी तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. किन्नर आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली. ज्यामुळे तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं होत. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी स्विकारली होती.
ममता कुलकर्णीला यादरम्यान नवीन नाव आणि ओळख देण्यात आली होती. ममता कुलकर्णी श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जात होती. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले होते. ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे अशा चर्चा सुरु असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठी यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं आहे.
यादरम्यान किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई देखील करण्याती आल्याची माहिती समोर आली. ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवल्यापासून, या निर्णयावरील वाद थांबण्याचे नाव घेत नव्हते. ममता महामंडलेश्वर झाल्यानंतर किन्नर आखाड्यातील संघर्ष वाढला आहे. तर किन्नर आखाडा लवकरचं नवे आचार्य महामंडलेश्वर घोषित करणार आहेत.