Kumbh Mela
Kumbh Mela

Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या ३ दिवसीय सभेचं आयोजन

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या वर्षी विश्व हिंदू परिषदेची तीन दिवसीय सभा आयोजित करण्यात आली आहे.
Published by :
Published on

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळयाला सुरुवात झाली आहे. सुमारे 1 कोटी भाविकांनी गंगेत आतापर्यंत स्नान केलं आहे. दिवसेंदिवस महाकुंभाची शोभा आणखीन वाढत चालली आहे. महाकुंभात जगभरातील भावीक स्नानाचा लाभ घेत आहेत.

अॅपलचे माजी संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीने देखील यात सहभाग घेतला आहे. प्रयागराजच्या पवित्र भूमीवर या वर्षी महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. मात्र, महाकुंभ आणि कुंभ म्हणजे नक्की काय? महाकुंभ आणि कुंभ वेगवेगळे का आयोजित केले जातात? महाकुंभ आणि कुंभांचं वैशिष्ठ्य काय आहे? याबाबत सर्वांना माहिती नसते.

महाकुंभमेळा किती वर्षांनी येतो?

महाकुंभमेळा हा दर 12 वर्षांनी एकदा होतो आणि हा मेळा सर्व कुंभमेळ्यांमध्ये सर्वात पवित्र मानला जातो. हा मेळा प्रामुख्याने प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो. याठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या संगमच्या काठावर मेळ्याचं आयोजन होतं. या विशाल मेळ्यामध्ये कुंभमेळ्यापेक्षा जास्त भावीक हजेरी लावतात. गुरू ग्रहाचे सूर्याभोवती एक परिक्रमण पूर्ण होते तेव्हा हा महाकुंभमेळ आयोजित केला जातो.

कुंभमेळा किती वर्षांनी येतो?

कुंभमेळा दर 3 वर्षांनी साजरा केला जातो. आणि हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज या चार ठिकाणी एक एक करून साजरा करण्यात येतो. प्रत्येक ठिकाणी एका चक्रात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते आणि या काळात दर 12 वर्षांनी प्रत्येक ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

विश्व हिंदू परिषदेची तीन दिवसीय परिषद

विश्व हिंदू परिषदेने प्रयागराज कुंभमेळा संकुलात 24 ते 26 जानेवारी या तीन दिवसीय सभेचे आयोजन केलं आहे. संत आणि धर्मगुरू यांच्याशी मार्गदर्शन आणि संवाद प्रस्थापित करणं, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या दिवशी केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक होणार असून, त्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com