Mahakumbh Mela 2025 : पंकजा मुंडे यांचे महाकुंभमेळ्यामध्ये शाहीस्नान, व्यक्त केल्या भावना
देशभरात सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. १४४ वर्षांनी आलेला हा कुंभमेळा प्रयागराज येथे भव्यरित्या आयोजित केला आहे. कुंभमेळा संपण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहे. या कुंभमेळ्यामध्ये आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. देशविदेशातून अनेक भाविक कुंभमेळ्यामध्ये येत आहेत. तसेच गंगा नदीमध्ये स्नानदेखील करताना दिसत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शाही स्नानाचा आनंद घेतला आहे. आशातच आता पंकजा मुंडे यांनीदेखील कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानाचा लाभ घेतला आहे. तसेच त्यांनी मंत्रोच्चार करत मनोभावे पूजादेखील केली. दरम्याने त्यांनी यावेळी महाकुंभमेळ्यामध्ये आलेल्या अनुभवाबद्दलही स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "महाकुंभ मेळ्यामध्ये येऊन मला खुप छान वाटत आहे. हा खुपच चांगला अनुभव आहे. शाही स्नानाचादेखील आनंद घेतला आहे. मी इथे एक पर्यावरणमंत्री म्हणूनही येथील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येऊनदेखील येथील व्यवस्थापन खुप चांगल्या प्रकारे केले आहे. 2027 साली महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथेदेखील कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे आम्ही याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आम्हीदेखील महाराष्ट्रातील कुंभमेळ्यात योग्य व्यवस्था करु शकू".