Delhi Railway : प्रयागराजला जाणाऱ्या गाड्या रद्द झाल्याने नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी दरम्यान 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमर आली आहे. तसेच या घटनेत अनेक जण जखमी झाले असून रेल्वे मंत्रालयाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रयागराजला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे रेल्वे प्रशासन अडचणीत आले आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द झाल्यानंतर ही घटना घडली असून रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वर चेंगराचेंगरी झाली. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रात्री 9:30 वाजता रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वर ही दुर्दैवी घटना घडली. प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर गोंधळ उडाला.
यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर ट्वीट करत यासंदर्भात काही माहिती दिली आहे. मोदींनी म्हटलं आहे की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझे संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. या चेंगराचेंगरीत बाधित झालेल्या सर्वांना अधिकारी मदत करत आहेत".