MahaKumbh Mela 2025 : महाकुंभमेळ्याच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी म्हणाले की, "सर्वाचे अभिनंदन आणि..."
भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, अर्थात महाकुंभमेळा प्रयागराजमध्ये सुरु होता. या महाकुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगम, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत संयोग जुळून आला होता. पौष पौर्णिमेच्या दिवशी 13 जानेवारी 2025 रोजी प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु झाला आणि महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाकुंभमेळ्याचा अधिकृत समारोप करण्यात आला. या समारोप कार्यक्रमाच्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वाचे अभिनंदन आणि आभार मानले.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, "भारत सरकारने महाकुंभमेळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास खूप मदत केली. महाकुंभमेळ्यादरम्यान काशी विश्वनाथ आणि विंध्यवासिनीचा एक सर्किट बनवण्यात आले होते. तसेच अयोध्या ते गोरखपुर पर्यंत दुसरे तर, प्रयागराज ते श्रृंग्वेरपूर मार्गे लखनऊ आणि नैमिषारण्य येथे तिसरे सर्किट, प्रयागराज ते लालापूर- राजापूर आणि चित्रकुट चौथे सर्किट, प्रयागराज ते वृंदावन असा पाचवे सर्किट,असे एकूण पाच सर्किट तयार करण्यात आले होते."
प्रयागमधील स्थानिकांचे आभार मानताना ते म्हणाले की, स्थानिक नागरिकांचे खूप आभार मानतो. त्यांनी घरच्या कार्यक्रमासारखा हा सोहळा मानला. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे तसेच साधू संतांचे मनापासून स्वागत केले. प्रयागराजमधील सर्व वातावरण भक्तीमय ठेवले. त्यासाठी मी सर्वाचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, असे योगी अदित्यनाथ म्हणाले.