Recipe : रात्री उरलेल्या चपातीपासून मुलांसाठी बनवा पिझ्झा; जाणून घ्या रेसिपी
लहाण मुलांना फास्टफूड (fast food) खूप जास्त आवडते. मात्र बाहेरचे जास्त खाणं झाले की त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
पिझ्झा (Pizza) हा पदार्थसुद्धा लहाण मुलांचा आवडता आहे. तर हा पिझ्झा तुम्ही घरी देखिल बनवू शकता. रात्रीच्या जेवणातील चपात्या राहून जातात आणि या चपात्यांचे काय करायचे हा प्रश्न समोर येतो. तर त्यासाठी आम्ही सोपा उपाय घेऊन आलो आहोत
तुम्ही लहाण मुलांसाठी या चपात्यांसाठी घरच्या घरी पिझ्झा बनवू शकता. तर तो कसा जाणून घ्या त्याची रेसिपी
पिझ्झासाठीचे साहित्य
उरलेली चपाती
एक चमचा तेल
एक कप किसलेले चीज
एक टेबलस्पून पिझ्झा सॉस
अर्धा कांदा
अर्धी शिमला मिरची
अर्धा टोमॅटो
अर्धा कप उकडलेले कॉर्न
चिली फ्लेक्स
ओरेगॅनो
पिझ्झा कसा तयार करावा
पिझ्झा (Pizza) बनविण्यासाठी सर्वात आधी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर या भाज्या उभ्या कापून घ्या. आता उरलेली चपाती घ्या. चपातीमध्ये किसलेले चीज भरा आणि नंतर झाकून ठेवा. आता चपातीच्यावर पिझ्झा सॉस आणि चीज पसरवा. नंतर त्या चपातीवर सर्व कापलेल्या भाज्या पसरवा. त्यानंतर वरून थोडं चीज घाला. आता कढई गरम करून त्यावर तेल किंवा बटर लावा. आता ही चपाती पिझ्झा पॅनमध्ये ठेवा आणि वरून झाकण ठेवा. ४ ते ५ मिनिटांनी झाकण काढून रोटी पिझ्झाचे चार तुकडे करा आणि मग त्यात ओरेगॅनो-चिलीफ्लेक्स घालून सर्व्ह करा.