Raksha Bandhan : रक्षाबंधनाला सुट्ट्या असतील तर भाऊ-बहिणींसोबत 'या' ठिकाणांना भेट द्या

Raksha Bandhan : रक्षाबंधनाला सुट्ट्या असतील तर भाऊ-बहिणींसोबत 'या' ठिकाणांना भेट द्या

यावर्षी 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. भाऊ-बहिणीच्या या खास सणात बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात, तर भाऊ त्यांना काही भेटवस्तू देतात. सहसा ते पैसे, चॉकलेट किंवा त्यांच्या बहिणी वापरत असलेल्या वस्तू असतात. पण या वर्षी भाऊ आपल्या बहिणींना काही खास भेटवस्तू देऊ शकतात.
Published by :
Team Lokshahi

यावर्षी 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. भाऊ-बहिणीच्या या खास सणात बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात, तर भाऊ त्यांना काही भेटवस्तू देतात. सहसा ते पैसे, चॉकलेट किंवा त्यांच्या बहिणी वापरत असलेल्या वस्तू असतात. पण या वर्षी भाऊ आपल्या बहिणींना काही खास भेटवस्तू देऊ शकतात. ज्यामध्ये तो आपल्या बहिणींना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकतो. यंदा राखी चार दिवस साजरी केली जात आहे. जर १२ तारखेला सुट्टी असेल तर तुम्ही ४ ते ५ दिवस सहलीचे नियोजन करू शकता.

रॉयल प्लेसला भेट द्या

भावंडांसोबत राजा-महाराजासारखे राजेशाही जीवन अनुभवायचे असेल तर राजस्थानला जाण्याचा बेत आखू शकता. तुम्ही राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, अजमेर, पुष्कर, जोधपूर अशा विविध शहरांना भेट देऊ शकता. तुमच्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला येथील विविध पर्यटन स्थळे आणि अस्सल खाद्यपदार्थ आवडतील.

डोंगरात निवांत क्षण घालवा

पावसाळ्यात डोंगरात फिरणे नक्कीच उत्तम. पावसाळ्यात इथले सुंदर नजारे बघायला मिळतात. जर तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणींसोबत मस्ती करायची असेल, तर तुम्ही लॅन्सडाउन, रानीखेत, कसाल यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. पण जर तुम्हाला पर्वत फिरायचे असतील तर मनाली, मसुरी, गुलमर्ग, शिमला यांसारख्या ठिकाणी जाऊ शकता.

समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता

तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ही समुद्र ठिकाणे फिरु शकता. जर तुम्ही समुद्रात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गोवा, पुडुचेरी, केरळच्या दिशेने जाऊ शकता. येथे तुम्ही तुमच्या भावंडांसोबत एन्जॉय करु शकता. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला भरपूर सुट्ट्या मिळत आहेत, प्रवासाचे नियोजन करून सुट्ट्यांचा दुप्पट आनंद घ्या

Raksha Bandhan : रक्षाबंधनाला सुट्ट्या असतील तर भाऊ-बहिणींसोबत 'या' ठिकाणांना भेट द्या
भारतातील 'या' ठिकाणी तुम्ही मोफत राहू शकता, येथे तुम्हाला मोफत जेवणासह अनेक सुविधा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com