थर्टी फर्स्टला बनवा घरच्या घरी 'हा' केक

थर्टी फर्स्टला बनवा घरच्या घरी 'हा' केक

थर्टी फर्स्ट म्हंटलं की अनेकजण घरी वेगवेगळे पदार्थ बनवतात. थर्टी फर्स्ट असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, लहान मुलांपासून ते वयस्कर आजी - आजोबांपासून सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे केक.
Published by :
Team Lokshahi

थर्टी फर्स्ट म्हंटलं की अनेकजण घरी वेगवेगळे पदार्थ बनवतात. थर्टी फर्स्ट असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, लहान मुलांपासून ते वयस्कर आजी-आजोबांपासून सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे केक. चला तर आपण जाणून घेऊया सहज, सोप्पी, घरच्या घरी बनवता येईल अशी केकची रेसिपी. तुम्ही सुध्दा ही रेसिपी नक्की घरी बनवा.

साहित्य:

३/४ कप दूध

२ टेबलस्पून लेमन ज्यूस

१ कप मैदा

३/४ कप पिठीसाखर

१/२ कप दुधाचे पावडर

१ टी स्पून बेकिंग पावडर

१/४ टीस्पून बेकिंग सोडा

१/२ कप तेल

१ टीस्पून पायनॅपल ईसेन्स

१/२ कप व्हीप क्रीम

१/२ कप पाइनॅपल जॅम

कृती:

एका बाऊलमध्ये दूध घेऊन त्यात लिंबाचा रस घालून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये मैदा, साखर, दुध पावडर, बेकिंग पावडर, आणि बेकिंग सोडा घालून या मिश्रणाला चाळून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये तेल आणि इसेन्स घालून केकचे बॅटर तयार करावे.

नंतर केकच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये थोडा मैदा शिंपडायचे. यानंतर त्यामध्ये तयार केलेले बॅटर घालायचे आहे. ओव्हन १० मिनिटासाठी प्रीहिट करावे व केकचे भांडे १८० डिग्रीला ३० मिनिटं ठेवावे आणि केकला बेक करून घ्यायचे आहे.

एका वाटीमध्ये घरी तयार केलेला पाइनॅपल जॅम घ्यायचे आहे. दुसऱ्या वाटीमध्ये व्हीप क्रीम तयार करून घ्यायचे आहे. साखरेचे पाणी तयार करून घ्यायचे आहे. केक थंड झाल्यावर त्याचे तीन भाग करा. सर्वात प्रथम खालच्या भागाला साखरेचे पाणी लावायचे आहे.

त्यानंतर जॅम आणि त्याच्यावर दुसरा भाग ठेवावा आणि त्याला सुध्दा तसेच करा. त्यानंतर तिसरा भाग ठेवल्यानंतर साखरेचे पाणी व सगळ्या बाजूने व्हीप क्रीम लावा. खालच्या भागाला अगोदर साखरेचे पाणी लावून घ्या आणि नंतर त्यावर जॅम लावावा व त्यावर व्हीप क्रीम लावावी. त्यावर दुसरा भाग ठेवा. मग परत वरून तिसरा भाग ठेवून साखरेचे पाणी व व्हीप क्रीम लावावी व सेट करण्यासाठी १५ मिनिटं फ्रीज मध्ये ठेवा. तुमचा पायनॅपल केक तयार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com