Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा घरच्याघरी पौष्टिक वरीच्या तांदळाचा पुलाव

उपवासाला बरेचदा लोक साबुदाणा खिचडी, चिवडा, वेफर्स इत्यादी पदार्थांचे सेवन करतात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आषाढी एकादशीनिमित्त उपवासाठी खास पौष्टिक आणि रुचकर वरीच्या तांदळाच्या पुलावची रेसिपी.
Published by :
Team Lokshahi
Published on

वरीच्या तांदळाचा पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

साखर

मीठ

रताळे

वरीचा तांदूळ

कोथिंबीर

हिरवी मिरची

आलं

लवंग

जिरे

तूप

वरीच्या तांदळाचा पुलाव बनवण्याची कृती:

सर्वप्रथम वरीचे तांदूळ धुवून घ्या. रताळ्याची साल काढून रताळ्याचे बारीक तुकडे उकडून घ्या. त्यानंतर मंद आचेवर तूपात ड्रायफ्रूट्स परतून घ्या. आता एका नॉन-स्टीक पॅनमध्ये आलं, लवंग, जिरे, हिरवी मिरची घालून थोडावेळ गरम होण्यासाठी ठेवा.

यानंतर त्यात स्वच्छ धुतलेले वरीचे तांदूळ, उकडलेले रताळ्याचे बारीक तुकडे, चवीनुसार साखर आणि मीठ घालून एकूण मिश्रण छान परतून घेऊन शिजवण्यासाठी ठेवावे. नंतर त्यात तूपात परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स एकत्रित करून घ्यावे. शेवटी सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला अशा प्रकारे तुमचा वरीच्या तांदळाचा पुलाव तयार होईल आणि तुम्ही उपवासाच्या दिवशी या पुलावाचा आस्वाद घेऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com