Chicken Momos Recipe: घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीत बनवा चटपटीत चिकन मोमोज; जाणून घ्या रेसिपी...

Chicken Momos Recipe: घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीत बनवा चटपटीत चिकन मोमोज; जाणून घ्या रेसिपी...

सर्वप्रथम मैद्यात चवीनुसार मीठ टाकून पीठ मळून घ्या आणि थोड्या वेळ एका बाजूला ठेवा.
Published by :
Sakshi Patil

चिकन मोमोज साहित्य –

एक वाटी चिकन खिमा

कांदा, लसून, अदरक, मिर्ची, टोमॅटो, कोथींबीर

मिरी, वेलची, शाहजीरे याला भाजून बारीक करणे

एक वाटी मैदा

एक छोटा चमचा तेल, मीठ

चिकन मोमोज बनवण्याची कृती

सर्वप्रथम मैद्यात चवीनुसार मीठ टाकून पीठ मळून घ्या आणि थोड्या वेळ एका बाजूला ठेवा.

आलं, लसूण, अदरक, मिर्ची, टोमॅटो, कोथींबीर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून त्याची पेस्ट करून घ्या.

आता एका पॅनमध्ये थोडं तेल, कांदा, आलं लसूण पेस्ट, मिरी, वेलची, शाहजीरेची पावडर आणि चिकन खिमा घालून मध्यम आचेवर निट शिजवून घ्या.

आता मैद्याचे छोटे उंडे करून पातळ पुऱ्या लाटून घ्या

या पुऱ्यांमध्ये तयार केलेलं चिकनचे सारण भरा आणि मोदकाप्रमाणे आकार द्या.

त्यानंतर हे तयार मोमोज कूकरमध्ये शिट्टी न लावता इडलीप्रमाणे १० ते १५ मिनिटे वाफवा.

गरमागरम मोमोज तयार होतील, शेजवान चटनी आणि मेयोनीजसोबत सर्व करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com