Chicken Popcorn Recipe
CRISPY CHICKEN POPCORN RECIPE | EASY RESTAURANT STYLE EVENING SNACK AT HOME

Chicken Popcorn Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला खास ट्रीट! एका वेगळ्या पद्धतीने तयार करा चटपटीत चिकन पोपकोर्न, वाचा सोपी रेसिपी

Evening Snack: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत आणि रसाळ चिकन पोपकोर्नची ही सोपी घरगुती रेसिपी नक्की ट्राय करा.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट तयार होणारे चवीला जबरदस्त आणि दिसायला आकर्षक स्नॅक्स सर्वांनाच आवडतात, त्यात चिकन पॉपकॉर्न हा प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ ठरला आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ अशा छोट्या-छोट्या चिकनच्या घासांचे हे स्नॅक्स पार्टी, किटी पार्टी, वाढदिवस, मूवी नाइट किंवा संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट लागतात.

बाजारात किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चिकन पॉपकॉर्नमध्ये जास्त तेल, कृत्रिम फ्लेवर किंवा अतिरिक्त मसाले असतात, पण घरी बनवलेला हा पदार्थ अधिक स्वच्छ, हेल्दी आणि तुमच्या चवीप्रमाणे मसालेदार करता येतो ज्यामुळे तो खास अनुभव देते.

या कुरकुरीत चिकन पॉपकॉर्नची घरगुटी रेसिपी तयार करण्यासाठी २५० ग्रॅम बोनलेस चिकनचे लहान चौकोनी तुकडे घ्या आणि त्यात २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, २ टेबलस्पून मैदा, १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, १ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून काळी मिरी पावडर, १/२ टीस्पून गरम मसाला, १/२ टीस्पून मीठ, १ अंडे आणि १ टीस्पून सोया सॉस घालून नीट मिसळा जेणेकरून चिकन सर्व बाजूंनी कोटेड होईल.

हे मिश्रण १५ ते २० मिनिटे मॅरिनेट होऊ द्या, नंतर कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून चिकनचे तुकडे थोडे-थोडे सोडून सोनेरी तळा ज्यामुळे ते कुरकुरीत होईल आणि टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल शोषले जाईल. गरमागरम तयार झालेला चिकन पॉपकॉर्न टोमॅटो केचप, मॅयोनीज, चीज डिप किंवा गार्लिक सॉससोबत सर्व्ह करा

त्यावर वरुन चाट मसाला किंवा लाल तिखट भुरभुरून चव आणखी वाढवा. जर कमी तेलात बनवायचे असेल तर एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्येही हे स्नॅक्स सहज तयार करता येतात ज्यामुळे ते अधिक आरोग्यदायी ठरतात. ही सोपी रेसिपी घरी कुटुंबासह मजा करत बनवता येईल आणि बाहेरील स्नॅक्सपेक्षा दहापट चांगली चव मिळेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com