Chilli Garlic Paratha : नाश्त्यासाठी झटपट बनवा गव्हाच्या पिठापासून स्वादिष्ट चिली गार्लिक पराठा

Chilli Garlic Paratha : नाश्त्यासाठी झटपट बनवा गव्हाच्या पिठापासून स्वादिष्ट चिली गार्लिक पराठा

सकाळची सुरुवात उत्तम नाश्त्याने झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्यात अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला कांदा पोहे किंवा पराठा हेच पहायला मिळते. अनेक प्रकारचे पराठे असतात.
Published by :
Team Lokshahi
Published on

सकाळची सुरुवात उत्तम नाश्त्याने झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्यात अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला कांदा पोहे किंवा पराठा हेच पहायला मिळते. अनेक प्रकारचे पराठे असतात. यामध्ये आलू पराठा, कांदा पराठा आणि गोबी पराठे, मेथी पराठे असतात. आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठापासून बनवलेला स्वादिष्ट चिली गार्लिक पराठा कसा बनवायचा याबद्दल सांगणार आहोत.

चिली गार्लिक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ - 1 वाटी

सुक्या लाल मिरच्या - 7-8

चीज - 1 क्यूब

लसूण - 10-12

मीठ - चवीनुसार

चिली गार्लिक पराठा बनवण्याची कृती

चिली गार्लिक पराठा बनवण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या त्यामध्ये थोडे मीठ टाका. थोडे तेल आणि पाणी घेऊन चांगले मिक्स करुन घ्या. पीठ सुती कापडाने झाकून थोडावेळ बाजूला ठेवा. यानंतर चीज किसून घ्या आणि लसूण, लाल मिरची आणि थोडे मीठ मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर पेस्ट एका भांड्यात काढून ठेवा.

पिठाचे गोळे करुन ते लाटून घ्या. त्यावर तयार केलेली चिली गार्लिक पेस्ट लावा आणि वर किसलेले चीज टाका. पराठा नॉनस्टिक तव्यावर थोडा वेळ शेकवा आणि नंतर प्लेटमध्ये काढून घ्या. सर्व पराठे त्याच पद्धतीने तयार करा. अशा पद्धतीने तुमचा चविष्ट चिली गार्लिक पराठा तयार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com