काकडीची भजी; बनवायलाही सोप्पी आणि खायलाही टेस्टी, रेसिपी जाणून घ्या

काकडीची भजी; बनवायलाही सोप्पी आणि खायलाही टेस्टी, रेसिपी जाणून घ्या

काही तरी स्पेशल टेस्टी आणि हेल्थी डीश खायचं आहे.
Published by :
shweta walge
Published on

काही तरी स्पेशल टेस्टी आणि हेल्थी डीश खायचं आहे. ज्याने मनही भरेल आणि पोटही. तर तुम्ही काकडीचे भजी बनवू शकता. चला जाणून घेऊया काकडीच्या भजीची सोपी रेसिपी-

साहित्य

काकडी - 3-4

बेसन - 1.5 कप

दूध - 1/4 कप

तांदूळ पीठ - 1 टेस्पून

जिरे पावडर - 1/4 टीस्पून

हिरवी मिरची - २

हल्दी पावडर - 1/2 टीस्पून

लाल तिखट - १/२ टीस्पून

हिंग - 1/4 टीस्पून

चवीनुसार मीठ

कृती

काकडीची भजी बनवण्यासाठी प्रथम काकडी नीट धुवून सोलून घ्या. आता ते किसून त्यातील पाणी चांगले पिळून घ्या आणि वेगळ्या प्लेटमध्ये ठेवा. आता त्यात तांदळाचे पीठ, जिरेपूड आणि चिमूटभर मीठ मिसळा. नंतर पुन्हा एकदा काकडीचे पाणी पिळून त्याचे गोळे बनवा. यानंतर एका भांड्यात बेसन, मीठ, हिंग, दूध, हळद आणि लाल मिरच्या एकत्र करून घ्या. जाड एकसंध पीठ बनवण्यासाठी थोडे थोडे पाणी घाला. आता काकडीचे गोळे बेसनात चांगले कालवून गरम तेलात तळून घ्या.

काकडीची भजी तयार आहेत. चटणीबरोबर सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com