Diwali Special : दिवाळीसाठी काहीतरी गोडं बनवायचंय! बनवा झटपट ब्रेडचे गुलाबजाम,जाणून घ्या रेसिपी

Diwali Special : दिवाळीसाठी काहीतरी गोडं बनवायचंय! बनवा झटपट ब्रेडचे गुलाबजाम,जाणून घ्या रेसिपी

दिवाळी हा सण जसा प्रकाशाचा सण आहे तसाच गोडीचाही आहे.
Published by  :
Team Lokshahi

दिवाळी हा सण जसा प्रकाशाचा सण आहे तसाच गोडीचाही आहे. मिठाईशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. सध्या प्रत्येकाच्या घरी दिवाळीची गडबड सुरू आहे. या दिवाळीच्या गडबडीत तुम्ही झटपट तयार होईल असे ब्रेडचे गुलाबजाम बनवू शकता. बनवयाला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. चला मग जाणून घेऊया रेसिपी.

साहित्य

पाक बनवण्यासाठी

२ वाट्या साखर

२ मोठे ग्लास पाणी

१ टी स्पून वेलची पावडर

गुलाबजाम बनवण्यासाठी

२ पॅकेट ब्रेड स्लाइस

१ कप दूध

८-१० काजू तुकडे

केशर

तूप किंवा तेल

बदाम व पिस्ता सजावटीसाठी

कृती

पाक बनवण्यासाठी एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी एकत्र करून मध्यम आचेवर पाक ठेवा. ५ ते ७ मिनिटांमध्ये पाक तयार होईल. पार फार पातळ किंवा फार घट्ट बनवायाचा नाही. अगदी थोडासा चिकट झाला पाहिजे. त्यात केसर, वेलची पावडर टाकून एकत्र करा आणि गॅस बंद करून भाडे झाकून ठेवा. गुलाबजाम बनवण्यासाठी प्रथम ब्रेडच्या चारी बाजूच्या कडा कापून बाजूला ठेवा. ब्रेडच्या कडा कटलेटसाठी वापरता येऊ शकतात. ब्रेडच्या कडा कापल्यावर एका बाऊलमध्ये ब्रेडचे पकोडे करून घेऊन त्याचा चूरा करून घ्या. मग त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून आपण जसे पीठ मळतो तसे मळावे. पीठ फार घट्ट किंवा सैल मळू नका. ५ मिनिटे बाजूला ठेवा. मळलेल्या पिठाचे छोटे -छोटे एक सारखे गोळे बनवा. एक गोळा बनवला की त्यात काडून खोचून नीट बंद करा. गोळ वळताना हाताला तेल लावून मळले तरी चालेल. कढईमध्ये तूप अथवा तेल गरम करून घ्या. गोळे नीट तळून घ्या. साखरेचा पाक बनवलेल्या भांड्यात तळलेले गुलाबजाम घालून झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे गरम करा. थंड झाल्यावर बाऊलमध्ये काढून घेऊन त्यावर बदाम व पिस्ते चिरून घालावा मग सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com