Diwali Special Sweet 2022
Diwali Special Sweet 2022Team Lokshahi

Diwali Special Sweet 2022 : घरीच बनवा 'ही' शुगर फ्री गोड मिठाई

सणाची वेळ येताच घरात मिठाई येऊ लागते. दिवाळीत सर्वजण मिठाई खातात. पण शुगरच्या रुग्णांना मिठाई खाण्यास मनाई असते.
Published by :
shweta walge
Published on

सणाची वेळ येताच घरात मिठाई येऊ लागते. दिवाळीत सर्वजण मिठाई खातात. पण शुगरच्या रुग्णांना मिठाई खाण्यास मनाई असते. अशा स्थितीत ते दिवाळीत गोड खाऊ शकत नाही. पण या दिवाळीत तुम्ही घरी साखरमुक्त मिठाई बनवू शकता. ज्याच्या मदतीने डायबिटीज असलेले प्रत्येकजण आरामात खाऊ शकतो. अंजीर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासोबतच मधुमेहाचे रुग्णही ते खाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया अंजीर बर्फी कशी बनवायची, जी शुगरचे रुग्ण सहजतेने खाऊ शकतात.

अंजीर बर्फी बनवण्यासाठी साहित्य

200 ग्रॅम अंजीर, 100 ग्रॅम खजूर, 50 ग्रॅम बेदाणे, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, तीन ते चार चमचे देशी तूप.

अंजीर बर्फी कशी बनवायची

अंजीर बर्फी बनवण्यासाठी प्रथम अंजीराचे छोटे तुकडे करा. सोबतच खजूरामधील बीया काढून टाका. आता अंजीर, खजूर आणि मनुका ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा. ह्यात पाणी टाकू नका. आता गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात दोन चमचे देशी तूप घाला. तूप घालून त्यात काजू, बदाम आणि पिस्ते हलके सोनेरी होईपर्यंत तळा. हे सर्व ड्रायफ्रुट्स काढून बाजूला ठेवा. आता हे सर्व ड्रायफ्रुट्स थंड झाल्यावर त्यांचे छोटे छोटे तुकडे करा.

आता त्याच कढईत ज्यात सुका मेवा भाजला होता. त्यात आणखी तूप घालून अंजीर, खजूर आणि मनुका यांची पेस्ट तळून घ्या. तळताना गॅस एकदम मंद ठेवा. आणि साधारण सात ते आठ मिनिटे तळून घ्या. भाजल्यावर त्यात सर्व चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगले मिक्स करावे. गॅस बंद करा. प्लेट किंवा ट्रेला देशी तुपाने ग्रीस करा. आता हे भाजलेले मिश्रण त्यावर पसरवा. थोडा वेळ थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर चौकोनी किंवा डायमंड आकारात कापून घ्या. स्वादिष्ट आणि आरोग्यदायी अंजीर बर्फी तयार आहे.

Diwali Special Sweet 2022
नवरात्रीच्या उपवासासाठी बटाट्याच्या 2 खास रेसिपी बनवा घरच्या घरी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com