google
चटकदार
कांदा भजी नव्हे, तर मुग डाळीच्या भजीने घ्या पावसाळ्याचा आनंद
बेसनापासून बनवलेली कांदा भजी आणि बटाटा भजी तर आपण खातोच, पण या पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गरमा-गरम कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी.
मुग डाळीची भजीसाठी लागणारे साहित्य:
मुगाची डाळ
रवा
कोथिंबीर
कांदा
आलं-लसूण पेस्ट
मिरची पेस्ट
मीठ
मुग डाळीची भजी बनवण्याची कृती:
सर्वप्रथम मुग डाळ स्वच्छ धुवून घ्या. यानंतर मुग डाळ मऊ होण्यासाठी 3 ते 4 तास भिजत घाला. भिजत घातलेली मुग डाळ मऊ झाल्यावर मिक्सरला लावून बारीक करून घ्या. भजी कुरकुरीत होण्यासाठी पीठ जास्त पातळ करू नये. तयार केलेल्या पीठात रवा, धणे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकत्रित करा.
यानंतर गॅसवर कढईत तेल घ्या आणि ते गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे भजीच्या आकाराचे गोळे करून ते मंद आचेवर तळून घ्या. यानंतर तयार झालेल्या भजी एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही गरमा-गरम कुरकुरीत मुग डाळीच्या भजीचा आस्वाद भर पावसात घेऊ शकता.