चटकदार
मुसळदार पावसाळ्याचा आनंद घ्या कुरकुरीत आणि चमचमीत पनीरच्या भजीसह
पावसाळा सुरु झाला आहे. प्रत्येकाच्या घरात काहीतरी खमंग आणि चटपटीत पदार्थ हे बनवले जातात. या पावसाचा आनंद दुप्पट पटीने घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कुरकुरीत आणि चमचमीत पनीर भजी.
पनीर भजीसाठी लागणारे साहित्य:
पनीर
तेल
तिखट मसाले
मीठ
लिंबाचा रस
आले-लसूण पेस्ट
तांदळाचे पीठ
पनीर भजी बनवण्याची कृती:
सर्वप्रथम पनीर कापून घ्या. एका बाऊलमध्ये कापलेले पनीर, तिखट मसाले, लिंबाचा रस, आले-लसूण पेस्ट हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. यानंतर तांदळाच्या पीठात थोडे पाणी टाकून सर्व पनीरचे मिश्रण तांदळाच्या पीठात टाका आणि छान एकजीव करून घ्या. यानंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवा.
तेल गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून मसाल्यात तयार केलेले मसाला पनीरचे तुकडे एक-एक करून अलगद तेलात सोडा. हलका ब्राऊन आणि सोनेरी रंग पनीर भजीला आल्यावर भजी एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे तुम्ही या पावसाळ्याचा आनंद पनीरच्या भजीसोबत घेऊ शकता.