Hartalika 2023: हरतालिकेचा उपवास, मग करा उपवासाचे हे चविष्ट , पचायला हलके पदार्थ!

Hartalika 2023: हरतालिकेचा उपवास, मग करा उपवासाचे हे चविष्ट , पचायला हलके पदार्थ!

हरतालिकेचा कडकडीत उपवास . काहीबाही खाऊन उपवास कशाला करा? हलक्या फुलक्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचं नियोजन आधीच करुन ठेवा. त्यासाठीचे हे पर्याय
Published by :
Team Lokshahi
Published on

अनेक महिला या दिवशी अगदी कडक उपवास करतात. उपवासाचं खाल्लं तरी हलकं फुलकं आणि मर्यादित प्रमाणातच असेल याची काळजी घेतली जाते. अनेकजणी तर तिखट मिठाचे पदार्थ न खाता गोड पदार्थ खातात. कडक उपवास असला आणि हलकं फुलकं खायचं असलं तरी हरतालिका उपवासाच्या दिवशी आहाराची काळजी घ्यायला हवी. काहीबाही खाऊन उपवास निभावून नेला जातो आणि दुसर्‍या दिवशी अशक्तपणा, अँसिडिटी असे त्रास होतात. तसं होवू नये म्हणून या उपवासाच्या आहाराचं नियोजन आदल्या दिवशीच करुन ठेवावं. जे खायचं ते जास्तीत जास्त पौष्टिक आणि पोटभरीचं कसं असेल याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे उपवासाच्या दिवशी शरीर आणि मन उत्साही राहील आणि काम करण्याची ऊर्जा मिळेल.

मिश्र फळांची कोशिंबीर

ही उपवास स्पेशल कोशिंबीर करण्यासाठी 1 वाटी डाळिंबाचे दाणे, 1 वाटी सफरचंदाचे काप, 1 वाटी अननसाचे तुकडे, 2 वाटी मलईचं दही, साखर, 2 छोटे चमचे जिरे पूड आणि चवीनुसार मीठ एवढं जिन्नस घ्यावं.

कोशिंबीर करताना वरील सर्व साहित्य आयत्यावेळी एकत्र करुन कोशिंबीर करावी आणि ती लगेच संपवावी. फळं खूप वेळ एकत्र करु नये. कोशिंबीर उरली म्हणून फ्रीजमधे ठेवून नंतरही खाऊ नये.

खजूर खसखशीची खीर

ही खीर करण्यासाठी अर्धा लिटर दूध, 50 ग्रॅम बिया काढलेले खजूर, चवीपुरता गूळ किंवा साखर, 2-3 चमचे खसखस घ्यावी.

खसखस कोमट पाण्यात किंवा दुधात 3 तास भिजत घालावी. मग बारीक वाटून घ्यावी. खजूर बारीक चिरुन घ्यावेत. कमी पाणी टाकून खजूर शिजवून घ्यावेत. वाटलेली खसखस दुधात घालून शिजवावी. खसखस 15 मिनिटं मंद आचेवर शिजल्यावर त्यात शिजलेला खजूर, गूळ किंवा साखर घालावी. चारोळ्या आणि बदामाचे काप घालून गॅस लगेच बंद करावा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com