जन्माष्टमीनिमित्त आंबोळ्या, शेगल्याची भाजी आणि काळ्या वाटाण्याची आमटी; वाचा रेसिपी

जन्माष्टमीनिमित्त आंबोळ्या, शेगल्याची भाजी आणि काळ्या वाटाण्याची आमटी; वाचा रेसिपी

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त अनेकांचा उपवास असतो.
Published by  :
Siddhi Naringrekar

श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त अनेकांचा उपवास असतो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने थाटामाटात साजरा केला जातो या उपवासाला शेगल्याची भाजी, आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याची आमटी केली जाते.

शेगल्याची भाजी

शेगल्याची पानं काढून घ्या. ही भाजी कापण्यापूर्वी धुवू नका. आता शेगल्याची पानं मुठीमध्ये घेऊन कोथिंबीर चिरतो त्यापद्धतीने ही भाजी चिरुन घ्या. आता चिरलेली भाजी स्वच्छ धवून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवा. आता चाळणीच्या सहाय्याने भाजी गाळून घ्या. जेणे करुन यामधील पाणी निघून जाईल. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाका. तेलामध्ये मिरची टाकून परतून घ्यात. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून पिवळा होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतल्यानंतर गॅस स्लो करुन त्यामध्ये शेंगल्याची चिरुन घेतलेली भाजी टाकून ती कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करुन घ्या. ही भाजी शिजत असताना तुम्ही कढईवर झाकण ठेवू नका. पाच मिनिटांमध्येच भाजी शिजते. शेवटी एक वाटी किसून घेतलेले खोबरं टाकायचे आहे. भाजीमध्ये खोबरं व्यवस्थित मिक्स करुन घ्या. त्यानंतर मीठ टाकून परतून घ्या.

काळ्या वाटाण्याची आमटी

वाटाणे कुकरमध्ये चांगले चार ते पाच शिट्ट्या काढून उकडून घ्यावेत. कांदा-खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. यासाठी ओले खोबरे खवून घ्यावे. कांदा पातळ उभा चिरावा. लसूण आणि आल्याचे काप करून घ्यावेत. हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यावे. त्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यावे. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात फोडणीसाठीचा कांदा टाकावा. त्यानंतर वाटलेले कांदा-खोबऱ्याचे वाटण घालावे आणि चांगले परतून घ्यावे. यात मसाला टाकावा. चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर उकडलेले काळे वाटाणे आणि त्याचे पाणी घालावे. चांगले ढवळावे. मीठ टाकावे. उकळी आली की गॅस बंद करावा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com