Chocolate Mousse Recipe: घरच्याघरी तयार करा एग्लेस चॉकलेट मूस; जाणून घ्या रेसिपी...

Chocolate Mousse Recipe: घरच्याघरी तयार करा एग्लेस चॉकलेट मूस; जाणून घ्या रेसिपी...

अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडतं.
Published by :
Sakshi Patil
Published on

अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडतं. चॉकलेट हा एक असा गोड पदार्थ आहे जो आपल्याला जास्तीत जास्त वेळ उर्जा देतो आणि शरीरातील साखरेची पातळी संतुलित करतो. यामध्ये आपल्या मनाला शांत करण्याची आणि आपल्या मूडला सुधारण्याची क्षमता असते. जाणून घ्या चॉकलेट मूस बनवण्याची रेसिपी...

साहित्य

1 कप चिरलेलं डार्क चॉकलेट

1/4 कप दूध

1 टीस्पून साखर

2 कप फेटलेली व्हीप्ड क्रीम

1/4 टीस्पून व्हॅनिला एसेन्स

2 टीस्पून मध

प्रक्रिया

बाऊलमध्ये चॉकलेट आणि दूध एकत्र करा आणि 30 सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.

त्यानंतर मायक्रोवेव्हमधून बाऊल काढा आणि गुठळ्या राहू नये तोपर्यंत चांगले मिसळा.

एका वाडग्यात साखर आणि 2 कप फेटलेली व्हीप्ड क्रीम एकत्र करा.

त्यात चॉकलेट-दुधाचे मिश्रण, व्हॅनिला इसेन्स आणि मध घालून नीट मिक्स करा.

समान प्रमाणात मिश्रण 4 स्वतंत्र वाट्या / ग्लासमध्ये घाला आणि कमीतकमी 1 ते 2 तास मूस सेट होईपर्यंत थंड करा.

सेत झाल्यावर प्रत्येक वाटीवर ¼ कप व्हीप्ड क्रीम आणि चॉकलेटने सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com