Virgin Mojito Recipe: उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी बनवा थंडगार वर्जिन मोजितो

Virgin Mojito Recipe: उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी बनवा थंडगार वर्जिन मोजितो

तुम्ही हॉटेलमध्ये मिळणारे मोजितो घरच्याघरी अगदी सोप्या पदतीने बनवू शकतो.
Published by :
Sakshi Patil

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारे पदार्थ जास्त प्रमाणात पिले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं थंड पेय पिण्यासाठी आवडतात. त्यातील एक प्रसिद्ध पेय म्हणजे व्हर्जिन मोजिटो. तुम्ही हॉटेलमध्ये मिळणारे मोजितो घरच्याघरी अगदी सोप्या पदतीने बनवू शकतो.

वर्जिन मोजितोसाठी साहीत्य

4 ते 5 लिंबाचे तुकडे

पुदिन्याची पाने

१ कप बर्फाचा चुरा

2 टीस्पून साखर पावडर

सोडा

१ ग्लास थंड पाणी

कृती

  • सर्व प्रथम एका ग्लासमध्ये लिंबू आणि पुदिन्याची पाने टाकून कुस्करून घ्या.

  • आता त्यात लिंबाचे १-२ तुकडे, २-३ पुदिन्याची पाने आणि बर्फाचा चुरा टाका.

  • त्यात साखर पावडर, थोडं थंड पाणी आणि सोडा टाकून मिक्स करा.

सोडा मिक्स करून झाल्यावर, सजावटीसाठी ग्लासला लिंबूचा एक तुकडा लावा. त्यानंतर हा मोजितो तयार होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com