इडली-डोसासोबत ट्राय करा साऊथ स्टाईल अल्लम चटणी

इडली-डोसासोबत ट्राय करा साऊथ स्टाईल अल्लम चटणी

आल्याचा वापर अनेक प्रकारच्या पाककृतींमध्ये केला जातो. याची चटणीही अतिशय चविष्ट लागते. यातीलच साउथ स्टाईल आल्याच्या चटणीची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

South Style Ginger Chutney : आले हे चव आणि आरोग्याने परिपूर्ण मानले जाते. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, जस्त, तांबे, मँगनीज आणि क्रोमियम सारखी पोषक तत्वे आल्यामध्ये आढळतात. आल्याचा वापर अनेक प्रकारच्या पाककृतींमध्ये केला जातो. याची चटणीही अतिशय चविष्ट लागते. यातीलच साऊथ स्टाईल अल्लम चटणीची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

इडली-डोसासोबत ट्राय करा साऊथ स्टाईल अल्लम चटणी
उरलेल्या चपातीपासून बनवा 'हे' खास सँडविच; सर्वांनाच आवडेल

साहित्य

किसलेले आलं, धणे, जिरे, मेथी आणि लाल मिरची, चना डाळ, उडीद डाळ, चिंच, गूळ आणि मीठ, कढीपत्ता,

कृती

एका कढईत थोडे तेलात घ्या आणि त्यात किसलेले आले २-३ मिनिटे शिजवा. यानंतर धणे, जिरे, मेथी आणि लाल मिरची, चना डाळ, उडीद डाळ भाजून घ्या. या सर्व गोष्टी चिंच, गूळ आणि मीठ घालून मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करा. आता एका पातेल्यात कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग आणि लाल मिरच्याची फोडणी तयार करा आणि ही फोडणी आल्याच्या मिश्रणावर घाला आणि तुमची चटणी तयार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com