'या' सुपरफूडमुळे वजन झपाट्याने होईल कमी, जाणून घ्या रेसिपी

'या' सुपरफूडमुळे वजन झपाट्याने होईल कमी, जाणून घ्या रेसिपी

आत्तापर्यंत तुम्ही तांदूळ, बेसन आणि रवा यापासून बनवलेले अप्पे खाल्ले असतील पण तुम्ही कधी मुळ्याचे अप्पे खाल्ले आहे का? जर नसेल तर आज आम्ही त्याच बद्दल सांगणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Healthy Food : वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संतुलित आणि कमी चरबीयुक्त आहार घेणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत निरोगी अन्न आणि कमी तेलकट पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ योग्य ठरतात. वाफेवर शिजवलेले अन्न आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आज आम्ही अशाच एका दक्षिणात्य पदार्थाबद्दल सांगणार आहोत, जो चवीसोबतच लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. आत्तापर्यंत तुम्ही तांदूळ, बेसन आणि रवा यापासून बनवलेले अप्पे खाल्ले असतील पण तुम्ही कधी मुळ्याचे अप्पे खाल्ले आहे का? जर नसेल तर आज आम्ही त्याच बद्दल सांगणार आहोत.

'या' सुपरफूडमुळे वजन झपाट्याने होईल कमी, जाणून घ्या रेसिपी
मिठाईमध्ये काही वेगळे खायचे असेल तर ट्राय करा 'हा' चविष्ट पदार्थ

साहित्य

रवा - १ कप

कांदा - 2 बारीक चिरून

टोमॅटो - 2 बारीक चिरून

मुळा - 1 कप किसलेले

हिरवी मिरची - ३ बारीक चिरून

कोथिंबीर - 3 चमचे बारीक चिरून

राई - अर्धा टीस्पून

मीठ - चवीनुसार

तेल - आवश्यकतेनुसार

कृती

मुळ्याचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम रवा मोठ्या भांड्यात चाळून घ्या.

आता त्यात सर्व भाज्या टाका आणि नीट मिक्स करा.

आता त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट तयार करा.

ही पेस्ट आप्पे मोल्डमध्ये भरून दोन्ही बाजूंनी चांगले बेक करा.

आप्पे शिजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढा.

आता कढईत तेल टाकून त्यात मोहरी टाकून तडतडल्यानंतर त्यात आप्पे टाका आणि सोनेरी होईपर्यंत तळा.

तुमचे चविष्ट मुळ्याचे आप्पे तयार आहे. ते चटणीसोबत गरमा-गरम सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com